कार्यानुभव विषयाची निवड
नवोपक्रमाची माझी गरज
माझी शाळा खेड्यात आहे. माझ्याकडे असलेला वर्ग हा चौथीया
९ ते १० वयोगट असलेली ही मुले-मुली. ह्या वयोगटातील मुले-मुली ही
बऱ्याच अंशी
आपल्या पालकांच्या कामात हातभार लावतात असे आढळून आले. उदा. घरातील
लहान
मुलांना सांभाळणे,
घरकाम सांभाळणे,
शेतात पालकांची भाकरी पोहचविणे, घरात गयी,
शेळ्या असतील तर त्या राखणे. अशी बरीच कामे माझ्या वर्गातील मुले
मुली करतात, असे
चर्चेतून, पालकांच्या भेटीतून निदर्शनास आले. यामुळे माझ्या वर्गातील
विद्यार्थ्यांच्या
पालकांचे शाळेविषयीचे मत उदासीन दिसले.
जिज्ञासा, काही तरी करुन दाखविण्याची जिद्द, उत्सुकता, नवनिर्मिती,
आत्मप्रकटीकरण या व इतर सहज प्रवृत्तींचा अविष्कार करण्याची संधी
मुला-मुलींना
उपलब्ध करवून देणे, विविध व्यवसायाशी निगडीत कौशल्ये व
क्षमता संपादन करण्याची
संधी निर्माण करणे, योग्य रितीने उत्पादनक्षमता
वाढविण्यासाठी प्रयत्न करावयास लाव इ.
दैनंदिन जीवनाशी व समाजाशी निगडीत अनेक उद्दिष्टे कार्यानुभवातून
साध्य होताता. सध्या
हस्तकलेचे वाढते महत्व, त्याचा उपयोग मुलांच्या उपस्थिती
बरोबरच विद्यार्थ्यांच्या भावी
आयुष्यात होणे सहज शक्य आहे, हे मला जाणवले. ज्या मुलांना/मुलींना
शाळेविषयी गोडी
नाही. अथवा जे विद्यार्थी अभ्यासात कचे असल्याने शाळेकडे पाठ
फिरवितात. काही विद्यार्थी
शाळेत येतात परंतु शाळा सुटेपर्यंत वर्गात टिकत नाहीत. अशा व इतर
अनेक कारणांवर
कार्यानुभव हा विषय विद्यार्थ्यामध्ये शाळेविषयी आवड निर्माण करून
देईल असे मला वाटले.
इतर वर्गाप्रमाणे माझ्याही वर्गाच्या काही समस्या होत्या. उदा.
मुलींचे सततचे गैरहजेरीचे
प्रमाण, मुलाची वारंवार गैरहजेरी, अध्ययन - अध्यापनातील निरसता इ. काही
गोष्टीच्या
मागील कारणे शोधण्याचा मी प्रयत्न केला. तेंव्हा मुलींविषयी एक
गोष्ट जाणवली. खेड्यातील
मुली ह्या शहरी भागातील मुलींपेक्षा सामाजिक बांधिलकीला अधिक महत्व
देतात. खेड्यातील
मुलींच्या दृष्टीने शिक्षणापेक्षा विविध कलागुणांना अधिक महत्व
असते. शहरातील मुलामिक्षा
ग्रामीण भागातील मुले ही अधिक कृतीशील असल्याचे जाणवते. ह्या सर्व
बाबींचा विचार करून
कार्यानुभव ह्या विषयाच्या माध्यामतून थोडीशी कल्पकता व योग्य दिशा
यातून काही उपक्रम
योग्य नियोजनातून राबविल्यास माझ्या समस्या सुटू शकतील, त्यांचे निराकरण होईल असे
मला वाटले. म्हणूनच मी कार्यानुभव ह्या विषयाचे क्षेत्र
उपक्रमासाठी निवडले.
कार्यानुभव विषय हे एक असे व्यापक क्षेत्र आहे. की, जे केवळ शिक्षणाच्या अथवा
कोणत्याही इयत्तेच्या चौकटीत बंदिस्त करणे कठीणच आहे. केवळ
ज्ञानार्जनातून नव्हे तर
प्रत्यक्ष कृतीतून मुलांना कौशल्ये आत्मसात होतात. म्हणूनच
कार्यानुभवातून दीर्घ काल
टिकणारे असे ज्ञान देता येते. एखाद्या आवडलेल्या उपक्रमातून (क्षेत्रातून)
त्याच
उपक्रमातील पुढील ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थी उत्सुक व्हावेत, यातुनच शाळेविषयी
मुलांची गोडी अधिक वाढत जाईल म्हणूनच हा उपक्रम मी निवडला. कृतीतून
आनंद व
आनंदातून शिक्षण व शिक्षणातून कौशल्ये हे माझ्या उपक्रमातील
वेगळेपण असावे असे मला
वाटते.
'कार्यानुभव विषयाची निवड, निर्माण होईल शाळेविषयी आवड' हा मी माझा
उपक्रम माझ्याच शाळेत केवळ माझ्या वर्गापुरता मर्यादित केला होता.
कार्यानुभव ह्या
विषयाकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे काही शिक्षकांना
कार्यानुभव विषयातून
साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या आधारेच हा
उपक्रम शैक्षणिक वर्ष
२००३-२००४ ह्या कालावधीत जुलै ते फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात
आला.
अत्यल्प खर्चाचा हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर माझ्या वर्गात
राबविण्याचा
प्रयत्न केला आहे. ह्या उपक्रमाकरिता सहज उपलब्ध होणारे अथवा सुलभ
किंमतीत
मिळणारे साहित्य वापरण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. काथ्या, सुतळी, कार्डशीट,
जिलेटिन, पेपर, दोरा, रंग, कात्री, फेव्हीकॉल, इ. लग्नपत्रिकेचे जाड कागद, वर्तमानपत्रातील
कात्रणे, जुन्या मासिकातील व पुस्तकातील चित्रे, पाने, फुले, काड्या इत्यादी सहज
परिसरात मिळणाऱ्या वस्तु ह्या उपक्रमात वापरल्या आहेत.
माझ्या ह्या नवोपक्रमामुळे माझ्या समस्यांचे निराकरण होऊन माझ्या
वर्गातील
विद्यार्थ्यांमध्ये बदल होणे अपेक्षित होते. याचबरोबर
विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही
शाळेविषयीचे स्वतःचे मत परिवर्तन करावे हे अपेक्षित होते. इयत्ता
चौथीकरीता शैक्षणिक वर्ष
०३-०४ ह्या वर्षात नव्यानेच इंग्रजी पाठ्यपुस्तक आले. त्यातील काही
घटक सुलभपणे
समजण्याकरीता ह्या कार्यानुभव विषयातून दिशा मिळविणे अपेक्षित
होते. प्रथम विद्यार्थ्यांची
उपस्थिती वाढली पाहिजे. ती टिकली पाहीजे त्यानंतर साहित्य
निर्मितीत सहभाग वाढला
पाहीजे असे वाटत होते, त्यानुसार योग्य व्यक्तींचा सल्ला
घेऊन, वेळापत्रक नियोजन व
त्यानुसार कार्यवाही यातून मला हा उपक्रम पूर्ण करावयाचा होता. तसे
मी केले व उपक्रम
यशस्वी झाला.
नवोपक्रम घेण्यामागची माझी उद्दिष्टे :-
मी माझा नवोपक्रम घेण्यापूर्वी त्याची गरज जाणून घेतली. यातून माझी
कोणती
उद्दिष्टे साध्य होतील हे ठरविले.
१) कार्यानुभव विषयाच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड
निर्माण
करणे.
२) कार्यानुभव विषयाच्या मदतीने पालकांमध्ये शाळेविषयी सकारात्म
दृष्टीकोन निर्माण करणे.
३) कार्यानुभवातून साहित्य निर्मिती करणे.
४) विद्यार्थ्यामधील स्वयंनिर्मितीस प्रेरणा देणे.
५) स्वयंनिर्मितीतून आनंद उपभोगण्यास प्रवृत्त करणे,
६) कार्यानुभवातून श्रमाचे महत्व पटवून देणे.
७)कार्यानुभवातून अर्थप्राप्ती करून स्वतःच्या शैक्षणिक गरजा
भागविण्याचा
नवीन दृष्टिकोन दाखवून कृती करण्यास प्रवृत्त करणे.
८) तयार केलेले साहित्य योग्य वेळी व योग्य पद्धतीने उपयोगात
आणण्यासाठी
प्रवृत्त करणे.
९) सहशिक्षक व शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही कार्यानुभव ह्या
विषयाकडे एक
गरज म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन निर्माण करणे.
कार्यानुभव विषयाबद्दल आवड निर्माण करणे,
१०)
११) कार्यानुभवाच्या माध्यमातून मुलींची उपस्थिती वाढविणे व
टिकविणे.
१२) साहित्यनिर्मितीमध्ये मुलींचा सहभाग वाढविणे.
१३) उत्कृष्टतेविषयी विद्यार्थ्याअंतर्गत स्पर्धा निर्माण करणे व
पोषक वातावरण
निर्मिती करणे.
नियोजन व कार्यवाही
कार्यानुभव ह्या विषयातून साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण शिक्षकांना
दिले गेले. तेंव्हा
माझ्या वर्गाबद्दल असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी
कार्यानुभवाच्या माध्यमातून
वेगळा असा उपक्रम राबविता येईल असे मला वाटले. हा उपक्रम राबविणे
कितपत योग्य ठरेल
किंवा कशाप्रकारे उपक्रमाची सुरुवात करावी याविषयी मी माझ्या
शाळेतील सहशिक्षक व
शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली. आपण केलेला उपक्रम अधिक
उठावदार व
यशस्वीपणे पूर्ण व्हावा याकरीता या विषयात प्रशिक्षणात मार्गदर्शन
करणारे श्री. सि. रा.
माशाळे यांच्याशी चर्चा करुन नियोजित उद्दिष्टे साध्य होण्याच्या
दृष्टीने कोणते प्रयत्न करावेत
याविषयीचे मार्गदर्शन मिळवले. उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता
तज्ञांच्या
मार्गदर्शनातून वेळापत्रक तयार केले.
