कर्म करा आणि फळाची अपेक्षा करु नका
कर्म करा आणि फळाच्या आशेचा त्याग करा हे अगदी साधसं
वाक्य आहे, पण संपूर्ण जगाचे ज्ञान ह्या एका वाक्यामध्ये सामावले
आहे. ह्यामधेच जीवनाचे वास्तव आहे, मोक्षाचा मार्ग आहे.
गीता भारतीय संस्कृतीमधला सर्वोत्तम ग्रंथ मानला जातो. प्रत्येक
भारतीयाच्या
मनामध्ये ह्या ग्रंथाविषयी आस्था आणि श्रद्धा आहे. फक्त भारतच नाही
तर
संपूर्ण विश्र्वानेच ह्या ग्रंथाचे महत्व जाणले आहे, प्रत्येक भाषेमध्ये ह्याचे
भाषांतर झाले आहे आणि जगभरातल्या असंख्य लोकांनी ह्याचे वाचनच केले
नाही तर त्याचे चिंतन, मनन आणि विश्लेषणही केले आहे. कार्य
करा
फळाची आशा करू नका. हाच गीतेचा महान संदेश आहे.
कर्म करा आणि फळाच्या आशेचा त्याग करा. हे अगदी साधंसं वाक्य
आहे, पण संपूर्ण जगाचे ज्ञान ह्या एका वाक्यामध्ये सामावले आहे.
ह्यामध्ये
जीवनाचे वास्तव आहे, मोक्षाचा मार्ग आहे, परमानंद मिळविण्याचा हा एकमेव
उपाय आहे. ज्यांनी हे जाणले आणि त्यानुसार आपले आयुष्य घडवले तर
समजा की त्यांनी सगळे काही मिळवले.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे
ज्ञान का दिले हे सगळ्यांना चांगलेच
माहीत आहे. महाभारताचे युद्ध होऊ नये, ते थांबावे म्हणून श्रीकृष्णाने
केलेले
सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. जेंव्हा युद्ध होणे नक्की झाले आणि
कौरव-
पांडवांचे सैन्य युद्धासाठी एकमेंकासमोर उभे ठाकले तेंव्हा
गांडीवधारी अर्जुनाने
श्रीकृष्णाला सांगितले की युद्ध चालू होण्यापूर्वी मी दोन्हीही
सेनांच्या योद्ध्याना
पाह इच्छितो. भगवान श्रीकृष्णांनी, जे तेव्हा अर्जुनाच्या रथाचे सारथी
बनले
होते, रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केला. अर्जुनाने बघितले की
सगळे नातलग युद्धासाठी एकमेकांविरोधात उभे आहेत, तसेच याशिवाय
गुरुजन आणि प्रिय बंधूही तिथे आहेत तेंव्हा त्याचे मन उद्विग्न आणि
दुःखी
झाले. त्याच्या मनात विचार आला की मी राज्य मिळविण्यासाठी करावे
युद्ध
का, राज्य मिळविणेच सगळं काही आहे का, माझे नातलग, पूज्य बंधू यांना
मारुन मी राज्य करावे ?
हा सत्याचा मार्ग नाही, ह्यापेक्षा संन्यासच चांगला आहे.
वेदांमध्ये तर हेच
सांगितले आहे की देवाला शरण जा; अशा गोष्टी स्वतःचे कर्तव्य विसरुन
नातेवाईकांच्या मोहामुळे अर्जुनाच्या मनामध्ये आल्या. त्याने भगवान
श्रीकृष्णाला
सांगितले की मला राज्य नको. मी माझ्या सग्या-सोयऱ्यांना मारण्याचे
पाप
स्वतःच्या शिरावर घेऊ इच्छित नाही, त्यापेक्षा राज्याची आस सोडून देऊन
जंगलामध्ये जाऊन देवाचा जप करणे अधिक श्रेयस्कर आहे आणि हेच तर
आपल्या वेदांमधे,
शास्त्रांमध्ये सांगितले आहे.
अर्जुनाच्या मनामध्ये ह्या प्रकारचे जे विचार उत्पन्न झाले ते काही
खालच्या
दर्जाचे नव्हते,
ते विचार स्वाभाविकच होते आणि उच्च पातळीचे होते. आज
आपल्यासमोर अनेक उदाहरणे देखील आहेत ज्याचा इतिहास साक्षी आहे की
ज्यांनी राज्य करणे सोडले आणि संन्यास घेतला. ईश्र्वराच्या चरणी
लीन झाले
आणि समाजाने त्यांना उच्च मानून त्यांचा आदर केला.
पण भगवान कृष्ण ह्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की तू युद्ध कर,
भिऊन, घाबरुन स्वतःच्या कर्तव्यापासून मागे हटू नकोस, संन्यास घेण्याचा
पळपुटा विचार आज तुझ्या मनामध्ये का येत आहे आणि तुला युद्धापासून
का
पळून जायचे आहे?
सग्या-सोयऱ्यांचा मोह टाळून स्वतःच्या कर्तव्याचे पालन
केलेस तरच तुला वीरमरण प्राप्त होईल. भगवान कृष्णाने अर्जुनाची
आसक्ती
दूर करण्यासाठी त्याला जीवनाचे वास्तव सांगितले आणि स्वतःचे विराट
रुप
दाखवले. तू हे जे काही म्हणतोस की मी ह्यांना मारून राज्य, सत्ता मळवू
इच्छित नाही,
तर तू प्रत्यक्षात कोण आहेस? तु तर निमित्तमात्र आहेस! हे तर
मरणारच आहेत,
तुला केवळ ह्यांना मारण्याचे श्रेय मिळणार आहे. तू तुझे काम
कर आणि फळाचा विचार करु नकोस. उद्या काय होईल हा विचार सोडून दे.
ह्या प्रकारे भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिले.
अर्जुन हा खूपच बुद्धिमान आणि तत्वज्ञानी होता. तो वीर लढवय्या
होताच
आणि युद्धाला घाबरतही नव्हता. त्याच्या मनामध्ये आलेले विचारही
उच्च
पातळीचे होते. ह्याच प्रकारे आपल्या जीमनामधेही अनेक घटना घडतात.
तेंव्हा आपण निर्णय घेऊ शकत नाही की हया वेळी काय करायचे आणि काय
नाही. लहान-सहान गोष्टी तर होतच राहतात. पण कधी कधी अशा
अडचणीउद्भवतात की तेंव्हा बुद्धी कामच करत नाही की काय करायचे? त्या
वेळी मनुष्य शांतपणे वागत नाही, स्वतःचे कर्तव्य ओळखत नाही, स्वार्थाने
अथवा मोहापायी चुकीचे पाऊल उचलतो.
बरेच लोक काम करा,
फळाची आशा करू नका ह्याचा चुकीचा अर्थ
काढतात की फळाची इच्छा न ठेवता कर्म करावे, असं समजल्यामुळे गोंधळून
जातात. फळ मिळविण्याच्या इच्छेविना कर्म कसं संभव होणार. प्रत्येक
गोष्ट
करण्यामागे काहीना काही उद्देश तर असतोच. तुम्हाला काम करण्यासाठी
शक्ती हवी म्हणून तुम्ही भोजन करता, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम
करायचे आहे आणि पैसे जमवायचे आहेत. स्वतःचे घर बांधयाचे आहे म्हणून
मिळणाऱ्या पैशातून थोडे पैसे शिल्लक टाकायला हवेत. दूरच्या
प्रदेशात जाण्यासाठी
तुम्ही रेल्वे किंवा इतर कोणत्या तरी वाहनाचा प्रयोग करता. सारांश
इतकाच
हे की कोणतेही कार्म फळाच्या इच्छेशिवाय होत नाही आणि होऊ शकत
नाही. प्रत्येक कर्माचे फळ तुमच्या इच्छेनुसारच मिळाले पाहिजे ह्या
आसक्तीचा
त्याग करायचा आहे. ही आसक्ती, मोह आणि स्वार्थाची भावनाच कर्माच्या
फळास दूषित करते.
आई-वडील स्वतःच्या मुलांचे पालन-पोषण करतात, त्यांना शिकवतात,
त्यांच्यावर पैसे खर्च करतात, हीच इच्छा ठेवून की उद्या मोठे
झाल्यावर मुलं
आपल्याला सुखी ठेवतील, पैसा कमवतील
