इतरांचे ऐकून घेण्याचे कौशल्य प्राप्त करा.
आपल्या सहवासात ज्या विविध व्यक्ती येतात त्यांच्याशी आपले
चांगले संबंध प्रस्थापित करावयाचे असतील व आपल्या भेटीचे पूर्ण
समाधान
त्यांना मिळवून द्यावयाचे असेल तर त्यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये
आपल्याला
एक महत्त्वाचा नियम पाळला पाहिजे व तो म्हणजे आपण दुसऱ्याचे बोलणे
शांतपणे व व्यवस्थितपणे ऐकून घेतले पाहिजे. व स्वतः बोलतांना मात्र
मोजके
व मुद्देसूद बोलले पाहिजे. जे लोक मितभाषी असतात त्यांच्या थोड्या
बोलण्यालाही खूप महत्त्व प्राप्त होते. याउलट जे लोक अघळपघळ व
ऐसपैस
बोलतात अशा लोकांचे बोलणे लोक फारसे गांभीर्याने घेत नाहीत, असे
आपल्याला आढळून येईल. म्हणून आपण असे धोरण ठेवायला हवे की,
इतरांचे बोलणे जास्त ऐकून घ्यायचे व स्वतः मात्र कमी बोलायचे.
आपल्याला
देवाने दोन कान दिले आहेत. व एक तोंड दिले आहे याचा अर्थ असा घेतला
पाहिजे की, समोरील व्यक्तीची चार वाक्ये ऐकली असली तर स्वतः दोन वाक्ये
बोलायला हरकत नाही. याचा अर्थ आपण जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट
प्रमाणा
मध्ये आपण समोरील व्यक्तीचे ऐकून घेतले पाहिजे. जे लोक इतरांचे
बोलणे
शांतपणे ऐकून घेतात व त्यासाठी इतरांना जास्तीत जास्त बोलते करतात
ते
लोक खरे व्यवहार चतुर आहेत असे म्हंटले पाहिजे. दुसऱ्याचे बोलणे
शांतपणे
ऐकून घेतल्यामुळे आपल्याला दोन प्रकारचे फायदे होतात. पहिला फायदा
म्हणजे समोरील व्यक्तीला पूर्णपणे बोलू दिल्यामुळे त्या व्यक्तीला
बोलण्याचे
पूर्णपणे समाधान मिळते. दुसरा फायदा म्हणजे समोरील व्यक्ती
अधिकाधिक
बोलण्यामुळे आपल्याला त्या विषयाची जास्त माहिती मिळते. तसेच विचार
करायला भरपूर वेळ मिळतो. व आपल्याला जे बोलायचे आहे त्याची
पूर्वतयारी
करायला भरपूर वेळ मिळतो. व तिसरा फायदा म्हणजे समोरील व्यक्तीला
भरपूर बोलू दिल्यामुळे ती व्यक्ती आपले म्हणणे ऐकण्याच्या मानसिक
तयारीत राहाते.
ऐकण्याचे कौशल्य वाढविण्यासाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे
आपल्याला ऐकण्याचे कौशल्य योग्य प्रकारे आत्मसात करावयाचे
असेल, तर खालील महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत.
• आपण ऐकत असलेले संवाद व त्याचा अर्थ काळजीपूर्वक समजावून घेतला
पाहिजे.
* दुसऱ्याचे बोलणे ऐकत असतांना त्याला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे व
आपण त्या व्यक्तीचे बोलणे काळजीपूर्वक ऐकत आहोत हे त्या व्यक्तीला
जाणवू दिले पाहिजे.
* समोरील व्यक्तीला अधिकाधिक बोलते करण्यासाठी आपण त्या व्यक्तीला
काही प्रश्न विचारले पाहिजेत. व त्या व्यक्तीस अधिकाधिक
बोलण्यासाठी
प्रोत्साहन दिले पाहिजे.
* समोरील व्यक्ती बोलत असतांना आपण त्याचे बोलणे ऐकण्यास उत्सुक
आहोत हे त्या व्यक्तीला दाखविले पाहिजे, ती व्यक्ती बोलत असतांना
आपण वर्तमानपत्र वाचणे अथवा कागदपत्रावर सह्या करणे हे योग्य होणार
नाही. म्हणून आपले लक्ष पूर्णपणे समोरील व्यक्तीकडे केंद्रित
करावे.
* समोरील व्यक्ती बोलत असतांना आपण मध्येच हस्तक्षेप करुन त्या
व्यक्तीचे बोलणे थांबवू नये अथवा त्यात अडथळा आणू नये.
* समोरील व्यक्ती ज्या विषयावर बोलत आहे तो विषय टाळून दुसऱ्या
विषयावर एकदम बोलणे सुरू करू नये.
* समोरील व्यक्ती बोलत असतांना त्या व्यक्तीचे शब्द ऐकण्याबरोबर त्या
शब्दांमागील भावना आणि विचार नीट समजून घ्याव्यात. समोरील
व्यक्तीचे बोलणे आपल्याला पटत नसले तरी संयम पाळून त्यावर एकदम
आपली प्रतिक्रिया उमटू देऊ नये अथवा रागावू नये.
* समोरील व्यक्तीच्या बोलण्यामधील एखादी गोष्ट आपल्याला समजली
नसेल उदा. एखादे नाव, आकडेवारी अथवा एखादा निरोप, तर त्याबाबत
समोरील व्यक्तीला विचारून ती माहिती पुन्हा नीट समजून घ्यावी.
* एखादी माहिती ऐकत असतांना आवश्यकता वाटल्यास ती माहिती लिहून
घ्यावी. उदा. फोन नंबर, एखाद्याचा पत्ता, अटी अथवा नियम या सारख्या
गोष्टी लक्षात ठेवण्याऐवजी लिहून घेणे चांगले असते.
