आपली जीवनदृष्टी आणि आपले आदर्श

 

आपली जीवनदृष्टी आणि आपले आदर्श

आपली जीवनदृष्टी आणि आपले आदर्श

स्वप्न पाहणारे लोक जगाचे रक्षणकर्ते असतात. दृश्य जग हे अदृश्य

असलेले कोणीतरी सांभाळते. त्यामुळे माणसे, त्यांचे अनेक प्रयोग सुरू

असताना, त्यांचे स्वार्थी उद्योग करीत असताना, कोणातरी एकट्यांच्या

स्वप्नाळू-सुंदर दूरदृष्टीमुळे पोसली जातात. मानवतेला जगातील स्वप्नाळू

माणसांना विसरता येणार नाही. तसेच त्यांचे आदर्श धुसर होत जाऊन नष्ट

होऊ देता येणार नाही. कारण सारी मानव जमात त्यांच्यामुळेच जगते

आहे. तिला ठाऊक आहे की, हे आदर्श, ही स्वप्ने एक दिवस आपल्याला

नक्की कळतील!

        गीत रचनाकार, नृत्यरचनाकार, शिल्पकार, चित्रकार, कवी, देवदूत,

साधू हे सारे स्वर्गाचे शिल्पकार आहेत. ते मृत्यू पश्चात असलेले जग

घडवतात. ही सगळी मंडळी जगात असतात, म्हणून जग सुंदर असते.

श्रम करुन जगणारी मानवजात त्यांच्या शिवाय नष्ट होईल.

जो हृदयात सुंदर स्वप्ने, उच्च आदर्श जतन करतो, त्याने त्या

 स्वप्नांना-आदर्शांना मनःचक्षूंसमोर प्रत्यक्षात आलेले पाहिले असते!

कोलंबसाने एका वेगळ्या जगाचे स्वप्न पाहिले होते आणि त्याने ते जग

प्रत्यक्षात पाहिले. कोपर्निकसने अनेकविध जगाची कल्पना आणि विशाल

विश्वाची कल्पना पुढे वाढविली आणि तसे प्रत्यक्षात असलेले शोधून

काढले. बुद्धाने निष्कलंक सौंदर्याने नटलेल्या आणि प्रगाढ शांतीने

भरलेल्या आध्यात्मिक जगाचे स्वप्न पाहिले आणि त्यात तो सदैव

राहिला.

             एकूणच, तुमची स्वप्ने, आदर्श, तुमच्या हृदयाच्या तारा छेणारे

संगीत, तुमच्या मनाचे सौंदर्य, तुमच्या शुद्ध विचारांना सजवणारे प्रेम, हे

सारे तुम्ही हृदयात जतन करुन ठेवा. कारण त्यातूनच साऱ्या रमणीय घटना

घडतील. स्वर्गीय वावरण अवतरेल . हृदयात जतन केलेल्या या साऱ्या

गोष्टींशी तुम्ही प्रतारणा केली नाहीत, तर शेवटी तुम्हाला हवे तसे जग

निर्माण होईल.

                    एखाद्या गोष्टीची इच्छा करणे, ती हवीशी वाटणे म्हणजे ती

मिळवण्यासारखे आहे. माणसाच्या मूलभूत इच्छा पूर्ण होतील का? आणि

त्याच्या अतिशय शुद्ध आणि पवित्र महत्त्वाकांक्षा त्यांना पोषक स्थिती न

मिळाल्यामुळे कोमेजून तर जाणार नाही ना? असा काही नियम काही की

मागितले की लगेच ते मिळाले.

भव्य स्वप्ने पहा, आणि आजशी स्वप्ने तुम्ही पाहाल, तसेच तुम्ही

व्हाल! तुमची स्वप्ने तुम्हाला खात्री देतात, की एक दिवस तुम्ही कोण

व्हाल त्याची! तुमच्या आदर्शांमध्ये शेवटी तुम्ही कोण व्हाल, याचे

भाकीत दडलेले असते.

            अतिशय भव्य यश हे सुरवातीला एक स्वप्नच असते. भव्य

वृक्षदेखील एका लहानशी बीजामध्ये दडलेला असतो. पुढे अति भव्य

मोठा दिसणारा पक्षी हा सुरुवातीला एका लहानशा अंड्याइतकाच असतो.

जीवाचे सर्वोच्च स्वप्न - एक देवदूतासमान होणे - या स्वप्नातच त्याने

प्रत्यक्ष देवदूत होण्याचे बीज दडलेले असते. स्वप्नांमध्ये पुढे वास्तवात

घडणाऱ्या घटनांची बीजे असतात.

      तुमची सध्याची परिस्थिती तुम्ही मनाशी बाळगलेल्या आदर्शासाठी

अनुकूल नसेल, पण जर तुम्ही तो आदर्श वेगळ्या दृष्टिकोनातून समजून

घेतला आणि तेथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलात, तर कदाचित तुमच्या

भोवतालची परिस्थिती अनुकूल होऊ शकेल. तुमची आंतरिक स्थिती

आणि तुमचे बाह्यजगत हे वेगवेगळ्या स्थितीत असू शकत नाही. समजा,

दरिद्रतेने आणि कुमालीच्या शरीरिक श्रमांनी पिचलेला, काहीसा रोगट

आणि धोकादायक वातावरण असलेल्या वर्कशॉपमध्ये काम करावे

लागणारा.. शालेय शिक्षणही घेऊ न शकलेला, तथाकथित पारंपारिक

सामाजिक सभ्यतेचे नियम व निकष न जाणणारा, मर्मज्ञता अंगी नसलेला

एक तरुण आहे. परंतु तो ह्यापेक्षा चांगल्या परिस्थितीची, बुद्धिजीवी

जगणची, पारंपारिक सामाजिक सभ्यतेने राहण्या-वागण्याची, शारीरिक

व वागण्यातील डौल व सौंदर्य आपल्यात आणण्याची स्वप्ने पाहतो आणि

त्यासाठी तो मनाशी काही योजना आखतो.

       जगण्याच्या काही आदर्श स्थिती तो मनाशी घोळवतो, अधिक काही

करू शकण्याचे स्वातंत्र्य आणि चांगल्या संधी मिळण्याची स्वप्ने त्याला

भरुन टाकतात.