स्वतःशी संवाद साधण्याची सवय

 

स्वतःशी संवाद साधण्याची सवय

 स्वतःशी संवाद साधण्याची सवय

स्वतःशी संवाद साधण्याची सवय ही चांगल्या सवयींपैकी एक चांगली सवय

मानली पाहिजे. मात्र फारच थोडे लोक विधायक आणि सकारात्मक रीतीने स्वतःशी

संवाद साधतात. ते बहुतेक नकारात्मक पध्दतीने स्वतःशी संवाद साधत असतात.

अथवा अशा प्रकारे स्वतःशी संवाद साधतात की जेणेकरुन त्यांची नकारात्मक

प्रतिमा अधिक ठळकपणे त्यांच्या लक्षात येईल.

मात्र जाणूनबुजून आणि पध्दतशीरपणे नियोजन करून फारच थोडे लोक

स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच जणांना स्वतःशी संवाद कसा

साधला पाहिजे याचीच मुळात माहिती नसते. मात्र आपल्याला जर जीवनात यशस्वी

व्हायचे असेल, आपली आत्मप्रतिमा बलवान बनवायची असेल आणि आपला

आत्मसन्मान वाढवायचा असेल आणि खऱ्या अर्थाने आपले व्यक्तिमत्त्व बलवान,

सामर्थ्यवान आणि स्वावलंबी बनवायचे असेल तर आपण हेतूपूर्वक आणि जाणीवपूर्वक

स्वतःशी संवाद साधण्याची कला आत्मसात केली पाहिजे.

मात्र स्वतःशी संवाद साधताना तो विधायक आणि सकारात्मक पध्दतीने

साधला जाईल याची आपण दक्षता घ्यायला हवी. या ठिकाणी 'स्व-संवाद' म्हणजे

काय हे प्रथम जाणून घेतले पाहिजे आणि सकारात्मक स्व-संवाद आणि नकारात्मक

स्व-संवाद यांतील फरकही आपण जाणून घेतला पाहिजे.

* स्व-संवादाचा अर्थ :

स्व-संवाद याचा अर्थ तुमचा आतला आवाज होय. स्वतःशी संवाद

साधण्यासाठी स्वतःशी मोठ्याने बोलणे आवश्यक नसते किंबहुना स्वतःशी मोठ्याने

बोलणे हे चारचौघांत शोभणारे नाही तसेच ते शिष्टाचारालादेखील धरून होणार

नाही. किंबहुना तुम्ही स्वतःशी मोठ्याने बोलू लागलात तर लोक तुमची चेष्टा

करतील किंवा तुम्हाला वेडसर समजतील.

तुमच्या डोक्यावर अथवा मनावर परिणाम झाला आहे आणि तुम्ही असंबंध

काही तरी बोलत आहात असेही लोक त्याचा अर्थ काढू शकतील म्हणून येथे तुम्ही

स्वतःशी मोठ्याने बोलणे अजीबात योग्य होणार नाही.

स्वतःशी आपल्याला जो संवाद साधायचा आहे तो मनातल्या मनातच साधायला

हवा आणि अशा प्रकारे मनातल्या मनात संवाद साधायचा सराव आपण करायला

हवा,

 

 

 

 

 

* स्व-संवाद ऐकणे आणि त्याला योग्य दिशा देण्याचे तंत्र

प्रभावी रीतीने स्वतःशी संवाद करण्यासाठी प्रथम स्वतःशी होणारा संवाद

नीट ऐकायला हवा. त्याचे नीट निरीक्षण करायला हवे आणि मग हा संवाद नीट

दिशेने व्हावा यासाठी प्रयत्नदेखील करायला हवे.

* प्रभावी स्व-संवादाची सप्तपदी :

आपला स्वतःशी होणारा संवाद अधिक प्रभावी रीतीने होण्यासाठी आपण

खालील सप्तपदीचे पालन करायला हवे. ही सप्तपदी अथवा सात पाऊले

खालीलप्रमाणे सांगता येतील-

१)

दिवसातून एक ठराविक वेळ आपण दिवसभरात स्वतःशी केलेला संवाद नीट

आठवून पाहा. उदा. रात्री झोपायच्या अगोदर १५ मिनिटे एकांतात आणि

शांत वातावरणात बसून आपण नेमके काय काय केले आहे आणि त्या संदर्भात

आपण स्वतःशी काय बोललो आहोत हे नीट आठवून पाहा. या एकूण स्व-

संवादापैकी सकारात्मक स्व-संवाद किती आणि नकारात्मक स्व-संवाद किती

हे नीट तपासून पाहा.

२) सकारात्मक स्वसंवाद करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा

स्वसंवादाचे अधिकाधिक फायदे आपल्याला प्राप्त करायचे असतील तर

आपला बहुतांश स्व-संवाद हा सकारात्मक पध्दतीने होईल याकडे तुम्ही

लक्ष दिले पाहिजे. सकारात्मक स्व-संवादाची काही उदाहरणे खालीलप्रमाणे

सांगता येतील-

१)

"मी आज सकाळी भरपूर व्यायाम केल्यामुळे माझा संपूर्ण दिवस अतिशय

उत्साही आणि फ्रेश वातावरणात पार पडला."

२)

"आज मी घातलेला नवीन ड्रेस माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप आवडला. मी

या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होते, असे मला खूप जणांनी सांगितले.

३)

"मी माझा आजचा पेपर खूप चांगल्या प्रकारे लिहिला. त्यामुळे मला फर्स्ट

क्लास मिळेल याची मला खात्री वाटते."

४) "मी ऑफिसमध्ये सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने मला आज सर्वांचे

चांगले सहकार्य मिळाले."

 

५) "मी सध्या आहार-विहाराकडे चांगले लक्ष देत असल्याने माझे आरोग्य

दिवसेंदिवस सुधारते आहे."