सर्व काही स्वतःसाठी
स्वप्रतिमा मनात अतिशय सकारात्मक, आत्मविश्वासी ठेवायला हवी. जर
बावळट, कमजोर असेल तर तसाच आपला बाह्य आविर्भाव राहतो. काही
व्यक्तींच्या चेहऱ्यावरून आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो. त्यांच्या
वागण्या-
बोलण्यात, हालचालीत एक शिस्त, दमदारपणा दिसून येतो. चालण्यात एक
डौल असतो. चेहऱ्यावरच्या आविर्भावात आपण कोणीतरी विशेष आहोत,
असे स्वगौरवाचे भाव असतात. स्वतःवर योग्य नियंत्रण असते. तर काही
व्यक्ती
चेहऱ्यावरून अत्यंत बावळट वाटतात. न्यूनगंडाचे पुरेपूर दर्शन
त्यांच्या हालचालीवरून
होत असते. हे कधी असते? जेव्हा आपल्या कामावर, वागण्यावर आपलाच
विश्वास नसतो. पण जेव्हा आपण काही उद्देश साध्य केला आहे, विशेष काम
केले आहे, मनाजोगे काम झाले आहे, आपल्या अचिव्हमेंटवर आपण खूश
असतो, तेव्हा आपला आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्त्वातून डोकावत (exude)
असतो. म्हणजे आपली स्वतःची प्रतिमा जशी आपण रेखाटतो, अगदी तीच
प्रतिमा जनमानसात व्यक्त होत असते.
प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. स्वत:ची मालक आहे. त्याने कुठले
काम
करायचे आहे हे त्यानेच ठरवायचे आहे. दुसऱ्याच्या इशाऱ्यावर न नाचता
स्वत:चा जीवनक्रम स्वत:च ठरवला पाहिजे. यंत्राचा एक स्क्रू
होण्यापेक्षा स्वत:च
एक यंत्र होणे उत्तम असते. नेहमी उच्च आदर्श समोर ठेवले पाहिजेत.
त्यातून
तुमच्या आकांक्षांना खतपाणी मिळेल. तुमची निश्चय करण्याची शक्ती
बळकट
होईल. स्वत:च्या गुणांचा विकास कसा करावा हे समजेल. तुम्ही
स्वतंत्र बुद्धीने
विचार करण्याचा प्रयत्न करा. मनातील गुलामगिरीची भावना काढून टाका.
तुम्ही
ध्येय कोणतेही ठरवले तरी ते झटक्यात साध्य होत नसते. त्यासाठी रोज
थोडी
थोडी प्रगती करावी लागते. हळूहळू विकास होत असतो. आपला आणि
रोज सकाळी म्हणून आपल्या कामाचाही. दिवस वाया गेला तर
काम मागे पडते.
उठल्यावर आज किती आणि कोणते कार्य करायचे हे निश्चित करा. किंवा
रात्री
झोपण्यापूर्वी उद्या काय करायचे आहे याची योजना आखा आणि
ठरवल्याप्रमाणे
काम झाले की नाही याचा अंदाज घ्या. जे काम झाले नसेल त्याची नोंद
घेऊन
ते काम पुढे चालू ठेवा. करिअर करणे म्हणजे तरी काय? आपला स्वभावधर्म,
कल ओळखून, मनाला आनंद देणारी जीवनशैली निवडणे. ते निवडण्याचे पूर्ण
स्वातंत्र्य आपल्याला असते. पैसा मिळवणे म्हणजे सर्वस्व नव्हे.
त्यापेक्षा कितीतरी
गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा
आहेत हे पाहण्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय पाहिजे हे समजले पाहिजे,
स्वतःचा स्वतःवर विश्वास असला की लोकांचा आपोआपच बसतो.
जगातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती कशा निर्माण झाल्या? कोल्हापूरच्या
महाराजांचा पॅलेस,
ताजमहाल, गेटवे ऑफ इंडिया,
बंगलोरचे विधानसौध असंख्य
गोष्टी. अर्थातच तुमचे उत्तर असेल की त्या कारागिरांनी निर्माण केल्या
म्हणून
अस्तित्वात आल्या. पण त्या प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांचा विचार
करणे महत्त्वाचे
होते. निर्मितीआधी त्या कलाकृतीचे स्वप्न पाहणे आवश्यक होते.
तेव्हाच त्या
दृष्टीने पावले उचलली गेली. म्हणून पहिली पायरी म्हणजे, योग्य ती स्वप्ने
पाहणे. मगच त्या दिशेने मार्गक्रमण करता येते. मुळात मनात काही
चित्रच नसेल
तर नजरेसमोर काय ध्येय ठेवणार? भलेही मनःचक्षूंसमोर जरी अंधुकशी
आकृती
असली तरी ती विचार केल्यावर स्पष्ट होऊ शकते. यशस्वी होणारी
व्यक्ती
सर्वप्रथम स्वप्ने पाहायला शिकते आणि त्याबरहुकूम पावले उचलते. ही
स्वप्ने
विकत मिळत नाहीत. किंबहुना ती समजली तरी आपलीशी होत नाहीत.
त्यासाठी स्वत:च विचार करावा लागतो. चिंतन, मनन, मनाला योग्य ती दिशा
दाखवावी लागते. क्वचित प्रसंगी आजूबाजूचे लोक मदत करतीलही, पण
त्यामध्ये आपला सक्रिय सहभाग हवा.
आपल्या आयुष्यात आलेल्या मोठ्यात मोठ्या अडचणी, संकटे म्हणजे
आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे असे म्हणायला हवे. कारण त्यामुळेच
आपण आत्मचिंतन करतो. आयुष्यात जे मोठे अनुभव येतात त्याची ही
पूर्वतयारी
म्हणायला हरकत नाही. सोने जसे अग्नीमध्ये तावून सुलाखून शुद्ध होते
तसेच
आपल्यावर येणाऱ्या अडचणी पार करून जणू अग्निदिव्य करून आपण सिद्ध
आरामाच होत असतो. तुमच्या मनात आकांक्षा नसेल, जबाबदारी पेलण्याची इच्छा नसेल,
आयुष्य आवडत असेल,
व्यवसायातील देणी,
कर्ज यांची काळजी
• दुसऱ्यांनी करावी,
तर तुम्ही वैभवाची, भरभराटीची आशा सोडली पाहिजे.
जबाबदारी पेलणे आणि आत्मविश्वास या दोन गुणांबरोबर यश मिळवायला
स्वातंत्र्याची भावना हवी. स्वतंत्र वृत्ती हवी. स्वत:वर विश्वास
ठेवायला घाबरू
नका. स्वतःच्या योग्यतेविषयी शंका घेऊ नका. मनात सतत नव्या
विचारांना
जागा द्या. आत्मविश्वास ही मानसिक गोष्ट आहे. तो मनात उत्पन्न करता
येतो.
आणि एकदा का मनात आत्मविश्वास उत्पन्न झाला की तुमच्यातले गुण तो
बाहेर काढतोच. प्रत्येकाचे आयुष्यातले महत्त्वाचे काम असते आपले
जीवितकार्य
म्हणजे स्वत:कडे जाण्याचा मार्ग शोधणे. स्वतःशी प्रामाणिक राहून
दृढनिश्चयाने
वागणे.
एक कावळा होता. त्याला आपल्या काळ्या रंगाचे फार वैषम्य वाटायचे.
पाण्यात पाहिले की तोकडे पंख आणि काळा रंग त्याची निराशा वाढवायचे.
हंस
कसा पांढराशुभ्र आहे. आपल्याला देवाने असा रंग का दिला नाही म्हणून
तो
दुःखी-कष्टी व्हायचा. एकदा तो गेला हंसाकडे. त्याचे ऐकून घेतल्यावर
हंस
म्हणाला, 'अरे रंगाचे काय घेऊन बसलास? तो पोपट पाहा किती छान, दुरंगी
आहे. त्याला निसर्गाने रंग आणि आवाजही बहाल केलाय. आपण जाऊन
पोपटाला विचारू.'
ते दोघे पोपटाकडे गेले. पोपटाने काही वेगळेच म्हणणे
मांडले. 'माझा रंग काही फार छान नाही. तो मोर पाहिलात? त्याच्या रंगात
अनेक छटा आहेत. नयनमनोहर अशा रंगांनी, पिसाऱ्यामुळे आणि तुऱ्यामुळे तो
कसा डौलदार वाटतो.' ते तिघे मोराकडे गेले. मोर आपला
पिसारा फुलवून उभा
होता. पण मनाने दु:खी-कष्टी दिसत होता. त्याने समर्थन केले, 'माझ्या पिसाऱ्यामुळेच
मला असे बंधनात अडकवले आहे.' माणसांना माझे रूप पाहायला आवडते,
त्यामुळे माझी इथून सुटका नाही, नाहीतर तो कावळा कसा मुक्तपणे हवेत
विहार
करतोय!' ज्या कावळ्याला आपल्या रंगाचे दुःख होते त्याला त्याच्या
स्वातंत्र्याचे
महत्त्व मोराने दाखवून दिले. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्यच
असतो.
आणि तिथेच त्याने आनंदी आणि सुखीही राहिले पाहिजे. दुसऱ्याशी तुलना
केली की पदरी नेहमी दुःख, निराशा येते. त्यापेक्षा आपणच आपले
ध्येय ठरवले
पाहिजे आणि ते योग्य प्रयत्नांनी गाठले पाहिजे.
आपल्याला स्वत:ला जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. स्वतःबद्दलची
माहिती जाणून घेणे ही सुरुवात असते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी
तुम्ही तुमचे
जीवन कसे जगू इच्छिता याची व्याख्या निश्चित करा. स्वत:शी एकनिष्ठ
राहण्यासाठी
कोणत्या मापदंडाची गरज आहे ते जाणून घ्या. सच्चेपणाने विचार करायचा
असेल, अनुभवायचे, वागायचे असेल,
तर तुम्ही जगात कसे वावराल ते स्पष्टपणे
कुठल्या घडामोडींमध्ये
ठरवा. कुठल्या गोष्टी यापुढे तुम्ही सहन करणार नाही,
तुम्ही भाग घेणार नाही, कुठल्या लोकांना तुम्ही तुमच्या
आयुष्यातून काढून
टाकायचे ठरवले आहे याची रूपरेषा स्वत:शीच स्पष्ट करा. अनेक वेळा
निराशा
इतकी घोर असते की माणूस काही ठोस निर्णय घेऊ शकत नाही. अशा कठीण
परिस्थितीत त्याचा परमेश्वरावरचा विश्वास उडतो. पण त्या कृपाळू
ईश्वराने आपल्याला
अशी एक अमूल्य शक्ती प्रदान केली आहे की, ज्या शक्तीमुळे माणूस कुठल्याही
संकटापासून स्वत:चा बचाव करण्यास समर्थ असतो. ही शक्ती म्हणजे
स्वतःशी
संवाद साधण्याचे सामर्थ्य. त्याला तुम्ही स्वसंवादही म्हणू शकता.
तुम्ही वास्तवात जसे आहात तसेच राहिलात तर आयुष्यभर ज्याची तुम्ही
इच्छा करता ती शक्ती, कुवत, शहाणपण तुमच्यात आधीपासूनच आहे हे
लक्षात ठेवा. जे बनण्याचे स्वप्न पाहात आहात ते मुळातच तुम्ही
आहात. फक्त
तुम्हाला ते कळायला हवे. जेव्हा हे कळते तेव्हा तुमच्यासाठी
असलेल्या
सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. फक्त स्वतःच्या हृदयात वारंवार
डोकावत
चला. स्वत:चा आत्मविश्वास जागृत ठेवा. स्वतःच स्वतःला खुलेपणाने
प्रश्न
विचारा, त्याची उत्तरे द्या. स्वतःशी प्रामणिक राहा. नको असलेल्या
विचारांना
टाळणे आणि त्या विचारांपासून पूर्णपणे सुटका होणे या दोन
वेगवेगळ्या गोष्टी
आहेत. तुमच्या मनात जर ईर्ष्यापूर्ण आणि वाईट विचार येत असतील, तर
आत्मसंवाद साधून ते विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला
समजवा.
दुसऱ्यांबद्दल द्वेष वाटल्यामुळे त्या व्यक्तीचा फायदा-तोटा काय
होतो यापेक्षा
तुमचे मन दूषित होते हे सत्य आहे. तुमचा दूषित मेंदू तुमचे आयुष्य
हराम करतो.
अशा मनःस्थितीमुळे दुसऱ्याबद्दल घृणा वाटायला लागते. दुसऱ्यांची
घृणा करता
करता तुम्ही स्वतःचीच एक दिवस घृणा करायला लागता.
१९९६ च्या ऑलिम्पिकसाठी एक नेमबाज स्पर्धेत उतरली होती. १७
दिवसांच्या तिच्या लहान बाळाला घेऊन निघालेल्या एका महिला
नेमबाजाला
तिच्या मित्राने सोडून दिले. ती स्पर्धेसाठी जात असतानाच तिच्यावर
हा आघात
झाला. आपल्या तान्ह्या मुलीला बरोबर घेऊन ती गेली. स्वतःचे
प्रशिक्षण चालू
ठेवले आणि तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. जीवनात आपल्याला
विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. सगळ्याच थोड्याफार फरकाने
सारख्याच
महत्त्वाच्या असतात. एकाही भूमिकेत मागे पडून चालत नाही. तुम्हाला
करायला
आवडतील अशा अनेक गोष्टी काही बांधिलकीमुळे करू शकत नाही. तुमच्या
इतर भूमिकांबद्दलचे विचार आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी
मिळवण्याची
तीव्र इच्छा हे एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्हाला तुमच्या
कार्यक्षेत्रापासून लांब
नेतात. मग एकाग्रता नाहीशी होते आणि हातून वारंवार चुका घडायला
लागतात.
तुमच्या दर्जापेक्षा कामगिरी घसरते. अशा वेळी बिरबलाची एक गोष्ट
आठवते.
एकदा बादशहा आणि बिरबल नदीकाठी फिरायला निघालेले होते. फिरत
असताना बादशहाच्या काय मनात आले कुणास ठाऊक, त्याने जवळच्याच
एका काठीने वाळूत एक रेघ मारली. त्या रेघेला स्पर्शही न करता ती
लहान करून
दाखवण्याचे आव्हान सगळ्यांपुढे ठेवले. बाकीच्या मंडळींनी प्रयत्न
केले पण ते
फसले. बिरबलाने मात्र काठी घेतली आणि त्या रेघेशेजारी एक मोठी रेघ
ओढली. त्यामुळे बादशहाने काढलेली रेघ आपोआप लहान झाली. इतर
लोहचुंबकांवर मात करेल असे प्रभावी लोहचुंबक स्वत:जवळ बाळगावे
लागते.
त्यामुळे मन सैरभैर करणाऱ्या इतर गोष्टींचा प्रभाव कमी होईल. तुमचा
तोल
ढळणार नाही. चित्त विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी
मनाला
शिक्षण द्यावे लागते. आवडणाऱ्या गोष्टींपासून शरीराला दूर ठेवून
चालत नाही,
तर विशिष्ट इच्छेमुळे नुकसान होतंय हे मनाला पटले तरच त्या
इच्छांवर मात
करता येते आणि मन विचलित होईनासे होते.
बाह्य आकर्षणापेक्षा शक्तिशाली असा लोहचुंबक तुमच्याजवळ आहे. तो
म्हणजे तुमची इच्छाशक्ती. तुमच्या विचारप्रक्रियेला योग्य ती दिशा
देऊन आणि
वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याची शिस्त अंगात बाणवून ही इच्छाशक्ती
दृढ
करू शकता. ती तुम्हाला नको असलेल्या आकर्षणापासून दूर नेईल. आपल्या
मनात अगणित इच्छा असतात आणि अंकुर न फुटलेल्या बियांप्रमाणे त्या
मानवी
मनात निद्रिस्त अवस्थेत पडून असतात. परिस्थिती अनुकूल होताच त्या
बियाण्याला
धुमारे फुटतात. त्या इच्छांची आपल्याला जाणीव व्हायला लागते.
