जाणीव जागृतीसाठी महिला प्रबोधन
शिक्षकाचे नाव - सिद्धाराम रायगोंडा माशाळे (जिल्हास्तर पुरस्कार
प्राप्त नवोपक्रम)
प्राथमिक शाळेतील मुलांची उपस्थिती टिकविणे ही मोठी समस्या आहे.
ग्रामीण
भागात शिक्षणाबाबत आजही हवे त्या प्रमाणात जागृती झालेली दिसत
नाही. शाळेच्या गुणवत्ता
वाढीसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या
विकासासाठी महिला प्रबोधन
प्रकल्पाद्वारे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातांच्या
मदतीने हा प्रकल्प राबविण्यात
आला. त्याला मिळालेल्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला.
अक्कलकोट हा सीमावर्ती आहे. या तालुक्यातील जनता कन्नड व मराठी या
द्विभाषिक बंधनात अडकलेली आहे. शिक्षणाबाबत तालुक्याची प्रगती
समाधानकारक आहे.
पण मुलींच्या शिक्षणाबाबत स्थिती फारशी चांगली नाही. हे १९९१ च्या
जनगणनेनुसार
दिसून आलेल्या स्त्री साक्षरतेच्या प्रमाणावरुन जाणवते. राष्ट्रीय
स्त्री साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा
कमी साक्षरता असलेल्या १०३ विकास गटापैकी हा एक तालुका आहे.
त्यामुळे याचा
आपोआपच परिणाम मिरजगी या गावावर प्रकर्षाने जाणवला. या गावात
शिक्षणाविषयी आवड
आहे पण मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण
करण्याची गरज आहे.
मुला-मुलींच्या कांही पालकांमध्ये शिक्षणाबद्दलची अनास्था दिसून
आली. या पालकांमध्ये
याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मातृ-महिला प्रबोधन प्रकल्प
राबविण्याचा निर्णय
घेतला.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी" या
उक्तीप्रमाणे
महिलांच्या प्रबोधनाने मुलींच्या शिक्षणाचे कार्य यशस्वी होईल असे
वाटले. त्यामुळे हा प्रकल्प
महिलांसाठी राबविण्यात आला. वडिलांपेक्षा आईचे लक्ष आपल्या
पाल्याकडे जास्त असते.
त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होईल. असा विश्वास वाटला. त्यामुळे
मुलामुलींची उपस्थिती
वाढविणे, शिक्षणाबाबत जागृती, गुणवत्ता वाढ व शाळेच्या विविधांगी
विकासासाठी महिला
प्रबोधन प्रकल्पाद्वारे प्रयत्न करण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती
घेतला. गावातील पालक
महिला-मातांच्या मदतीने हा उपक्रम यशस्वी केला. मुलींच्या
उपस्थितीचे प्रमाण कमी होते.
मुलींना शाळेत पाठविण्याची विनंती केल्यावरही पालक मुलींना शाळेत
पाठवत नसत. ज्या
गावात हा उपक्रम घेतला त्या मिरजगी गावात भटक्या विमुक्त समाज
मोठ्या प्रमाणात आहे.
निरक्षरांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे मुलींच्या उपस्थितीची
समस्या भेडसावत होती.
ही समस्या दूर करण्यासाठी हा उपक्रम
राबविला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी
पंचायत समिती शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. यासाठी
लागणारी आर्थिक
तरतुदही पंचायत समितीने केली होती. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्या
सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला या कालावधीत अनेक तज्ञ
मंडळीनीही मार्गदर्शन
केले. त्यामुळे हा उपक्रम जी उद्दिष्टे समोर ठेवून राबविला गेला
त्या उद्दिष्टाप्रत पोहचण्यास
मदत झाली. ही समस्या मला स्वत:ला जाणवली त्यामुळे या विषयाबाबत मी
उपक्रम
राबविला. याचा निश्चित उपयोग इतर शाळा व शिक्षकांना होईल असा
विश्वास वाटतो.
नवोपक्रमाची माझी गरज
कुटुंबाची जबाबदारी पुरुषांवर असली तरी या कुटुंबातील बालकांच्या
शिक्षणाची
व बालसंस्काराची जबाबदारी मातांची असते. "जिच्या हाती
पाळण्याची दोरी ती जगाची
उद्धारी” असे ज्योतिरावांनी म्हटले आहे. त्यामुळे महिलांची कुटुंबातील भूमिका
फार
महत्वाची आहे. हे महत्व ओळखून महिला शिक्षणाचा प्रसार करण्यात येत
आहे. घरातील
मुलींच्या शिक्षणाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी हा 'महिला प्रबोधन प्रकल्प हाती
घेण्यात आला. या प्रकल्पांर्गत अनेक उपक्रम घेण्यात आले. रक्षाबंधन, बालसभा,
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर माता पालकांसाठी महिला मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांचे प्रबोधन
करण्यात आले. या महिला
मेळाव्यामध्ये अनेक मान्यवरांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
त्याचा निश्चित फायदा
झाला आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी पंचायत समिती अक्कलकोट चे मोलाचे सहकार्य
लाभले. गटशिक्षणाधिकारी टी. ए. नरळेसाहेब यांच्या प्रेरणेने व
मार्गदर्शनाखाली हा उपक्रम
राबविण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे
मैंदर्गी बीटचे शिक्षण विस्तार
अधिकारी एम. पी. स्वामी, केंद्रप्रमुख एस. एच. होटकर आदींचे
वेळोवेळी या प्रकल्पासाठी
मार्गदर्शन लाभले. गावातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत
अंगणवाडी, ग्रामस्थ
महिला, ग्रामशिक्षण समिती, महिला केंद्र, स्वयंसेवी संस्था शाळेतील शिक्षक
यांच्या
सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला.
या महिला प्रबोधन प्रकल्पात घेण्यात आलेल्या उपक्रमांचा निश्चित
परिणाम
झाला असून अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी त्यांची मदत झाली
आहे.
मी हा नवोपक्रम ज्या शाळेत -गावात घेतला त्याठिकाणी अनेक समस्या
होत्या.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत माता उदासित होते. मुलींच्या
शिक्षणाबाबत अनास्था होती.
गावात अंधश्रद्धेपोटी बालविवाहाचे प्रमाण मोठे होते. मुलींची
पटनोंदणी व उपस्थिती याबाबत
अडचणी होत्या. गावातील महिला व मुलींचे प्रबोधन करणे आवश्यक होते.
म्हणून हा
नवोपक्रम घ्यावासा वाटला.
या उपक्रमाची स्थानिक पातळीवर मिरजगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर या
ठिकाणी अत्यंत गरज होती. पालकांची शिक्षणाबद्दलची अनास्था दूर
करण्यासाठी हा उपक्रम
राबविण्यात आला. हा उपक्रम राबविण्याची गरज मला पुढील कारणांमुळे
वाटली.
कारणे :-
आजूबाजूच्या परिसरात पालकांची शिक्षणाबाबत आवड निर्माण होण्यासारखी
परिस्थिती नव्हती.
पालक स्वत: निरक्षर असल्याने शिक्षणाबाबत जास्त गोडी नाही.
मुलींसाठी मिळणाऱ्या सोयी व शासकीय योजनांची पुरेशी माहिती नाही.
गावात ३ री, ४ थी पर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी ५ ते ७ कि. मी.
दूर जावे लागते. त्यामुळे मुलींची शिक्षण मधूनच थांबते.
घरातील लहान मुले सांभाळतो व घरकाम ही मुलींना लावली जातात.
पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अर्थार्जनासाठी मुलींना
शाळेत
पाठविले जात नाही,
कामाला पाठविले जाते.
मुलगा व मुलगी याबाबतचा पारंपारिक दृष्टीकोनातून मुलीकडे बघितले
जाते.
या उपक्रमाचा कालावधी सात महिन्याचा होता. सप्टेंबर २००० ते मार्च
२००१
या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण
परिषदेच्या मुलींचे शिक्षण जाणीव जागृती कार्यक्रमाप्रमाणे या
कालावधीत हा उपक्रम
राबविण्यात आला.
हा उपक्रम जिल्हा मराठी शाळा मिरजगी, ता. अक्कलकोट जि. सोलापूर येथील
सुमारे १५० विद्यार्थी व त्यांच्या माता-पालकांसाठी घेण्यात आला.
मिरजगी शाळेत शिकत
असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मातांसाठी हा उपक्रम घेण्यात आला.
शाळेत उपस्थिती कमी
असलेल्या मुलींच्या मातांसाठी हा उपक्रम विशेष करुन राबविला. या
शाळेतील मुली, हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या मुली, महिला मंडळ पदाधिकारी या सर्वासाठीही
हा उपक्रम होता.
यामध्ये सर्वांना समावून घेण्यात आले. उपक्रमाचे क्षेत्र मिरजगी
गावापुरते मर्यादित आहे.
हा उपक्रम मिरजगी ता. अक्कलकोट जि. सोलापूर (महाराष्ट्र) येथील
शाळेत
राबविला असून या परिसरातील ४ ते ५ गावांमध्ये उपयुक्त आहे. या
उपक्रमाच्या कार्यवाही
नंतर झालेले परिणाम व निष्कर्ष इतर गावांमध्ये लागू होतीलच असे
नाही. ही या उपक्रमाची
मर्यादा आहे.
