चेंज
हे माझं ध्येय आहे. एक मुलगा, एक शिक्षक, एक पुस्तक, एक लेखणी एवढ्या
बळावर जग बदलता येतं. दहशतवादाशी लढायचा सोपा मार्ग आहे, पुढची पिढी
आजवर तुम्ही कित्येक गोष्टींचा सामना करत आलेला आहात; पण त्या गोष्टींना
बदलण्याचा विचारच तुम्ही करत नाही. “जग झुकतं झुकवणारा पाहिजे” असे तुम्हीच
आणि विसरताही. बुद्धिवादी म्हणवून घेणारे आपण, यशासाठी देवाकडे साकडे
घालतो, देव पाण्यात काय ठेवतो! जग बदलतंय, पळतंय, यशाची कास धरत आहे
आणि तुम्ही फक्त त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता. आपल्यातल्या
एखाद्याला नोबेल
मिळतो दहा वर्षांतून एकदा आणि तिकडे एकाहून एक दावेदार असतात. हो, हो,
माहीत आहे तुम्ही काय म्हणताय, आपलं सरकार असलं, भ्रष्टाचार आहे, संधी नाहीत,
पण स्वतःला विचारा यास जबाबदार कोण? तुम्ही आधी की तुमचं सरकार आधी?
जगाला आपल्याला फार पुढे न्यायचं आहे, भारताचं नाव सर्वत्र करायचं आहे,
- दुसऱ्या जगाचा शोध घ्यायचा आहे, जागतिक शांतता पसरवायची आहे, पण हे सर्व असे
बसून होणारच नाही. संकटे तर मोठी असणारच त्याशिवाय त्यांच्याशी
लढण्यात काय
मजा? जीवन एकदाच मिळते (सात वेळेस नाही) हे सांगण्याची गरजच नाही, ते तुम्ही
कसे जगाल हे तुम्हीच ठरवा; पण त्यानुसारच तुमचं भविष्य बनत जाईल, हे लक्षात ठेवा.
एका लेखामध्ये एक वाक्य वाचलेलं मला आठवतंय - "आपण भूतकाळ, वर्तमानकाळ
आणि भविष्यकाळ असे जगत आहोत असा आपला समज आहे, तो पूर्ण
चुकीचा असून आपण आधी भविष्यकाळ जगत असतो (जाणतो), त्याला
वर्तमान बनवतो व तेच भूतकाळ बनते.” जगण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा कधी
प्रयत्नच तुम्ही करीत नाहीत.
आपण एज्युकेटेड आहोत हा जो आपला समज आहे तो चुकीचा बनत चालला
आहे. एज्युकेट हा शब्द 'एड्युको' या मूळ लॅटिन शब्दावरून घेतला गेला
आहे.
अर्थ म्हणजे,
"तुमच्या आतील गुणांना बाहेर काढून
त्यास नवीन आयाम देऊन
त्याचा उपयोग स्वत:स शिक्षित करण्यास करणे” असा आहे, जे आपण करतच
नाही. तुमच्यासाठी एज्युकेटेडचा अर्थ, कॉम्प्यूटर येणे, पदवी मिळवणे, हायक्लास नोकरी
करणे, भरपूर पैसा कमावून सुंदर मुलीशी लग्न करणे व संसार थाटणे असाच
असतो. माझा
असा अर्थ नाही की या सर्व गोष्टी असू नयेत; पण या सर्व गोष्टी असतानाही आपण जगतोय
कुठे हेही महत्त्वाचे. पदवी, नोकरी, पैसा, संसार, संपत्ती या सर्व गोष्टी असू द्यात; पण तुम्ही
यातूनही जगत नसाल,
समजाप्रती काहीच करत नसाल, जागतिक समस्यांवरती फक्त
कट्ट्यावरतीच चर्चा करत असाल, तर तुम्ही एड्युकेटेडच्या नावाखाली
ढोंग रचताय, हे
• लक्षात असू द्या. तुम्ही कधी विचार केला आहे का की, या आपल्या शिक्षणाचा आपल्याच
घरातील समस्या सोडवण्यावर उपयोग झाला आहे? जास्तीत जास्त लोकांचे उत्तर 'नाही'
असेच येईल. जग जरूर बदलायला लागेल आधी स्वत:चे घर बदलायला शिका.
वाद न मिटवता बाहेरच्या गोष्टी आपण कधीच मिटवू शकणार नाही. हे बघा, माणूस हा
शिकण्यासाठीच बनलेला आहे, ज्या गोष्टी जमत नाहीत त्या शिकाव्याच
लागतात आणि
महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी शिकता येण्याजोग्या असतात.
पुढे काही उदाहरणे दिली आहेत ज्यातून एक माणूसही जगात बदल घडवून
आणू
शकतो याचा प्रत्यय आपल्याला येईल. डोक्यात काही तरी करून जाण्याचे
वेड असलेल्या
या व्यक्तींनी स्वतःबरोबरच जगालाही बदलून टाकले. बदल हाच त्यांचा
ध्यास होता.
महात्मा गांधी- यांना भारताचे राष्ट्रपिता संबोधले जाते. बापूंनी
आपल्या देशाच्या
स्वातंत्र्यासाठी कशाचीही भीती न बाळगता इंग्रजांशी लढा दिला.
जगाला त्यांनी अहिंसेचा
आणि सत्याचा मंत्र दिला. त्यांनी स्वतःला देशासाठी वाहून घेतले.
कित्येक वेळा त्यांना
तुरुंगवास भोगावा लागला. देशातील नागरिकांना त्यांनी
इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकजूट
केले. प्रतिकार करण्यासाठी त्यांनी जीवनभर शांतीपूर्ण मार्गाचा
स्वीकार केला आणि शेवटी
सर्वांच्या मदतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. एक माणूसही
किती चांगल्या पद्धतीने
बदल घडवू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण गांधीजींच्या रुपाने
आपल्यासमोर आहे.
स्टीव जॉब्स- अॅपल कंपनीची आपल्या घरातील गॅरेजमध्ये स्थापना
करणाऱ्या स्टीवने
त्याच्या रचनात्मकतेच्या, सर्जनशीलतेच्या जोरावर संगणक
क्षेत्रात जगाला वेड लावून
सोडणारे बदल घडवून आणले. मॅक कॉम्प्यूटर, आयपॅड, आयपॉड या प्रॉडक्टमुळे तंत्रज्ञान
क्षेत्रात नावीन्यतेचा ध्यास निर्माण झाला. आज या क्षेत्रात
नावीन्यतेमुळेच क्रांतीकारी बदल
घडून येत आहेत.
वर्नर वॉन ब्राउन- हे जर्मन-अमेरिकन रॉकेट अभियंते होते. मंगळ
ग्रहावर जाण्याचे
स्वप्न पाहणाऱ्या ब्राऊनला दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला शरण जावे
लागले. पुढे अमेरिकेच्या
रॉकेट विकासात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. अमेरिकेच्या रॉकेट
विकासासाठी त्याने
घेतलेल्या परिश्रमामुळे मानवाला अंतराळ क्षेत्रात प्रचंड मोठी झेप
घेता आली. चंद्रावर
पहिला मानव उतरवण्यासाठी ब्राऊनने प्रचंड परिश्रम घेतले आणि शेवटी
त्याने तो इतिहास
रचलाच ज्याचे तो स्वप्न पाहत होता.
एक माणूस बदल नक्कीच मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर- यांना अमेरिकेचा गांधी म्हटले जाते. ते एक सुधारक व धर्मगुरु होते. अमेरिकेतील निग्रो लोकांबरोबर होत घडवू शकतो. बस्स, तसा
असलेला भेदभाव थांबविण्यासाठी त्यांनी पुढाकार विश्वास त्याच्यात हवा.
घेतला. गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव
होता. त्याच तत्त्वाचा
वापर करून त्यांनी आंदोलने केली. निग्रो समूदायाला त्यांचे हक्क
मिळवून देण्यासाठी
त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. १९६४ मध्ये त्यांना शांततेचा
नोबेल पुरस्कार देवून
सन्मानित करण्यात आले.
राईट ब्रदर्स- ऑर्विल आणि विल्बर राईट या बंधूंनी तो आविष्कार केला
ज्यामुळे
माणूस हवेत उडू शकला. हवेत उडण्यासाठी त्यांनी जी कल्पना मांडली
त्यावर कित्येकांनी
टीका केली. लोकांनी त्यांच्या कल्पनेला वेड्यात काढले. पण ते हार
मानणाऱ्यातले नव्हते.
राईट बंधूंनी आपल्या कल्पनेवर प्रयोग चालू ठेवले, त्यात बदल केले, अपयशाचा सामना
केला आणि शेवटी १७ डिसेंबर १९०३ रोजी त्यांना आपल्या प्रयोगात यश
आले. त्यांनी
त्या दिवशी पहिली यशस्वी उड्डाण घेतली. त्यांच्या या आविष्कारामुळे
जगाने मोठ्या
प्रमाणात प्रगती साधली.
थॉमस एडिसन- प्रयोगांमध्ये अपयश येत असताना आपण हार मानून बसतो. पण
एडिसनसारखा व्यक्ती हजार वेळेस अयशस्वी होऊनही म्हणतो की, मी अयशस्वी न होण्याचे
हजार मार्ग शोधून काढले आहेत त्या माणसाला यश कसे नाही मिळणार.
फक्त तीन महिने
शाळा शिकलेल्या,
लहानपणी वर्तमानपत्र, पुस्तके विकण्याचे काम करावे
लागलेल्या
एडिसनने अनेक क्रांतीकारी शोध लावले. विजेचा बल्ब हा त्यापैकीच एक.
एडिसनने त्याच्या
जीवनात एक हजार पेक्षा जास्त गोष्टींचे शोध लावले. त्याच्या त्या
शोधांनी संपूर्ण जगाला
बदलून टाकले.
एक माणूस खरेच सर्वांच्या जीवनात फरक आणू शकतो. जगाला अहिंसा तत्व
देणारे
महात्मा गांधीजी,
भ्रष्टाचाराविरुद्ध सर्वांना एकजूट व्हायला लावणारे अण्णा हजारे हे
आपल्यातलेच ना?
मग तुम्ही जगात स्वत:ला एज्युकेटेड म्हणवणारे बदलाची सुरुवात का
नाही करू शकणार? कुणाचीही चिंता करू नका, लगेच उठा, तुम्हाला आवड आहे
