यशाचे सूत्र

 
यशाचे सूत्र


यशाचे सूत्र

 
यशस्वी होण्याची ज्याची-त्याची वेगवेगळी व्याख्या असू शकते. परंतु
सामान्य माणूस उद्दिष्ट पूर्ण करून सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करून आणि लोकप्रियता
मिळवणं यालाच यश समजतो. सरळ भाषेत सांगायचं झालं तर पद आणि यश
या दोन्ही गोष्टीला यशस्वीता समजलं जातं. यशस्वी होण्यासाठी माणूस जीवाचं
रान करतो, सर्व शक्ती एकवटून कामाला लागतो.
यशस्वी होणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे, त्याला
टिकवून ठेवत यशप्राप्ती काही शेवट नसतो, ही एक अखंड चालणारी प्रक्रिया
आहे. यशस्वी मधला मार्ग असत नाही. परंतु हे खरं आहे की, यशस्वी
झाल्यानंतर त्या यशाला कायम ठेवण्यासाठी तुम्हाला जरूर करता येईल.
सामूहिक जबाबदारीला महत्त्व द्या :
एखाद्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही त्या विशिष्ट विभागाचे प्रमुख
बनता. तुमचं वैयक्तिक असं काही राहात नाही. तुमचं यश हे सामूहिक यश समजलं
जातं. ज्यामध्ये तुमचं नेतृत्व आणि तुमचा कर्मचाऱ्याची कार्यक्षमता दोन्हींचा
समावेश असतो, यासाठीच पहिलं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे
मी च्या ठिकाणी आम्ही आणि माझ्याऐवजी आमचं याची सवय लावून घ्या आणि
त्याची अंमलबजावणी करा.

तयारी आणि सक्रियता :

बाहेरच्या जगात होणारा बदल आणि त्यामुळे तुमच्या संस्थेचा होणारा
फायदा-तोटा लक्षात घेणं दुसरं सूत्र आहे. काळानुसार व्यवहार करायला शिका
आरोग्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण तुमचं शारीरिक आणि
मानसिक निरोगी असणं लोकांच्या प्रेरणेचा विषय झाला पाहिजे. गांड
व्यावहारिक बना :
पक्षपात, कौटुंबिक कलह, स्वार्थ, वैयक्तिक मानहानी आर्दी गोष्टींबाबत
तुमच्या कार्यक्षमतेवर शंका घेतल्या जाऊ शकतात. म्हणून व्यावहारिक बना. असा
तिसर सूत्र सांगत नियम, कायदे आणि निपक्षता व इतर शिष्टाचाराचे स्वतः पालन
केले जावे. तुमच्यावर टीका झाली तर आगपाखड करू नका. इतरांपेक्षा चांगल्या
गोष्टी तुम्हाला कशा करता येतील याचाच विचार करा. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला
सर्वश्रेष्ठ बनायचे आहे, या उद्देशाने कामाला लागा.

नम्र बना :

यश वाजत गाजत येतं; पण त्याबरोबर अहंकार नावाच्या राक्षसालादेखील
घेऊन येतं. यशासोबत अहंकाराची नशाही चढत जाते आणि तुमचे वाईट दिवस
जवळ यायला सुरुवात होऊ लागते. स्वतःकडे साध्य म्हणून नव्हे, तर साधन म्हणून
पाहा आणि नेहमी नम्रपणा अंगी असू द्या.
व्यवहार कौशल्य गरजेचं आहे :
कर्मचाऱ्याला मार्गदर्शन करणे, हे निश्चित आव्हानात्मक काम आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसे असतात. असे
असताना त्यांना समजावून सांगा. त्यांना योग्य मार्गदर्शन देणं अत्यंत गरजेचं असतं.
 व्यवहार कौशल्यावर काम करा. भावनिक होण्याऐवजी मेंदूचा
व्यवहारामध्ये आत्मियता असणे गरजेचं आहे.
वापर करा.

मोठेपणा कायम ठेवा :

पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही सामान्य माणूस राहत नाही. तर विशेष बनता
तुमचा स्वभाव व्यवहार, क्रिया-प्रतिक्रियांकडे लोकांचे लक्ष असते. इतकेच नाही
तर, ते तुमचं अनुकरण करण्याच्या प्रयत्नात असतात. स्वतः मोठेपण किंवा त्या
पदाला शोभेल अशी वर्तणूक तुम्ही ठेवली पाहिजे. असं हे पाचवं सूत्र सांगतं.
छोट्या छोट्या गोष्टींसाठी एखाद्यावर चिडणे, ओरडणे, रागावणे, मनात सुडाची
भावना ठेवून वागणे, सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला अपमानित करणं, तुमच्या
पदाला शोभणारं नसतं.

योग्य अंतर गरजेचं :

व्यावसायिक संबंधामध्ये विशिष्ट अंतर ठेवून व्यवहार करणे गरजेचे असते.
लोकांसाठी तुम्ही एक गूढ व्यक्तिमत्त्व असला पाहिजेत. त्यामुळे प्रगती आणि
लोकप्रियता सतत होत राहील...गर

यशस्वी जीवनाचे सूत्र

'एखाद्याच्या गुणाचे कौतुक करण्यात वेळ घालवू नका. त्याचे गुण
आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही अनुभवलं असेल की, अनेकदा आपल्या सभोवतालची माणसे अशी
चर्चा करत असतात की, अशा महत्त्वपूर्ण गोष्टी बोलत असतात की, ज्यामुळे
आपला आपल्या जीवनाकडे स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतीकडे बघण्याचा
दृष्टिकोन बदलून जातो.
पुस्तकी गप्पा बाजूला करून त्या लोकांच्या दृष्टिकोनातून जीवन
जगण्याचा प्रयत्न करा. जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. तर
तुमचं उद्दिष्ट अधिक सोपं होईल. एकदा प्रयत्न तर करून पाहा. तुम्हाला
 अनेकदा सभा-संमेलनात जाण्याची संधी मिळत असेल. तिथे गेल्यावर
लोकांसोबत चर्चा करा. त्यांच्यात मिसळून जा आणि त्यांना त्यांच्या यशाचे
रहस्य विचारा. नवीन माणसे कसे यशस्वी होऊ शकतात ? प्रगती करण्यासाठी
मी काय केलं पाहिजे. मी खात्रीनं सांगतो की, जीवन जगण्याच्या संदर्भात
प्रत्येक माणूस एकच गोष्ट तुम्हाला सांगेल, ती म्हणजे जे काही करायचं
आहे. ते मनापासून करा. कष्ट करण्याची तयारी ठेवा. खाली असेच महत्त्वपूर्ण
मुद्दे दिले आहेत. कधी काळी मीदेखील ते इतरांकडून शिकलो होतो.
१) जबाबदारी ओझं नाही तर एक शक्ती आहे.
२) जीवनात केवळ इच्छा बाळगू नका तर उद्दिष्ट पाळा.
३) माझ्याजवळ जे काहीविशेष आहे.
४) आपल्याजवळ शरीर, वेळ आणि विचार या तीन महत्त्वाच्या गोष्टी
आहेत.
५) आनंदी राहणे ही एक सवय आहे आणि कष्ट करणे हीदेखील एक सवय
आहे.
६) यशाचे तीन नियम आहेत: कठोर परिश्रम, आत्मविश्वास,
आत्मविकास.
७) कोणतेही काम केवळ काम म्हणून नाही तर प्रगती करण्यासाठी करा.
८) जीवनभर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर कामावर प्रेम करायला
शिका.
९) अपयश ही अशी संधी आहे. जी तुम्हाला एखादी गोष्ट पुन्हा नव्याने
सुरुवात करायला शिकवते.
१०) धावण्याचा वेळ दिवसभर फिरतो. पण असतो त्याच जागेवर
११) शिक्षित असण्यापेक्षा वाचत, लिहित राहा.
१२) दलदलीमध्ये पोहायला शिकता येत नाही.
१३) इच्छेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण भविष्यात पश्चाताप होणार
नाही की, ही गोष्ट करून पाहिली नाही.
१४) प्रत्यक्ष संवाद ही गोष्ट मैत्री टिकून ठेवण्यासाठी अत्यावश्यक बाब
आहे.
 १५) प्रत्येक दिवसांची सुरुवात सुखद समाधानी दृष्टिकोनाने करा. तुमच्या
लक्षात येईल की, तुमचा दिवस आनंदी आणि अर्थपूर्ण गेलेला आहे...
 
यशस्वी जीवनाची महत्त्वाची काही सूत्रे
 आवडीचे काम मनापासून करत गेलात तर मनासारखे पैसे मिळवायला
वेळ लागत नाही.
तुम्हाला श्रीमंत करणारी जगाच्या पाठीवर फक्त एकच व्यक्ती आहे
आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः.
 
 पैसे बुद्धीनेच कमवायचे आणि बुद्धीनेच गुंतवत जायचे. सुरुवातीला फक्त
काही दिवस तुम्ही पैशासाठी काम करा. नंतर पैशालाच तुमच्यासाठी
काम करायला लावा.