संधी ओळखायला शिका
'प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक भाग्याचा
क्षण येत असतो. तो कधी येईल,
दिवसा, रात्री, दुपारी,
सकाळी येईल ते सांगता येत नाही. ती एक संधीच असते.
ती जणू भरतीच्या
लाटेप्रमाणे असते. ही लाट कधी लवकर येते तर कधी उशिरा
येते; पण ती पकडायला नेहमी तयार असावे
लागते. भरतीची ही लाट जो
त्यासाठी थांबतो
त्यालाच लाभू शकते. त्यासाठी नेहमी सावध असावे लागते.
यालाच कोणी म्हणतात
भाग्य, तर
कोणी म्हणतात नशीब; पण याची संधी साधणे
मात्र पूर्णपणे
तुमच्याच हातात असते.' असे मेरी
टाउनशेड यांचे म्हणणे आहे.
जॉर्ज इलियट म्हणतो, “मिळालेली संधी माणसाला वापरता
आली नाही तर
त्याचा काय उपयोग? ती कधीच स्थिर राहत नाही.
काळाच्या ओघात ती वाहून
जाते.” तर डिझारायली यांचे म्हणणे असे की, “ज्या
वेळी सुसंधी येईल त्या
वेळी माणसाने ती
पकडायला तयार पाहिजे. आयुष्यातील यशाचे हेच खरे रहस्य
आहे.” तो म्हणतो, “मिळालेल्या संधीचा जो उपयोग
करत नाही त्याला संधी
मिळून काय उपयोग? जी संधी समोर येईल त्याचा
जास्तीत जास्त उपयोग जो
करून घेतो त्यालाच या
जगात अपूर्व यश प्राप्त होते.
इंग्लंडमध्ये थॉमस कुक
नावाचा लेथवर काम करणारा एक कारागीर होता.
एकदा त्याला
मद्यपानाच्या निषेध संमेलनासाठी लिसेस्टर या गावी पंधरा मैल
चालत जावे लागले. चालत
जाताना त्याच्या मनात विचार आला की अशा
संमेलनासाठी जर काही
व्यवस्था आपण केली तर लोक जाऊ शकतील आणि
त्याने प्रवाशांच्या
सुखसोयीसाठी, त्यांच्या
तिकिटांची व्यवस्था करणारी एक कंपनी
सुरू केली. ही प्रवासी
कंपनी आज थॉमस कुक या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांची
मोठमोठी जहाजेही आहेत.
कधी कधी वाईटातून
चांगले निष्पन्न होते कसे ते सांगते. प्रसंगी वाईट
घटनेचाही एक संधी
म्हणून जर वापर केला तर काय होते ते पहा. अमेरिकेत मेन
नावाच्या शहरात एक
शेतकरी होता. त्याची बायको आजारी होती. बायकोचे
कपडे धुण्यासाठी तो
शेतातले काम आटपून रोज लवकर घरी यायला लागला.
त्याच्या आधी कपडे धुणे
म्हणजे काय हे त्याला माहीत नव्हते. त्याला लक्षात
आले की कपडे धुण्याचे
काम खूप सावकाश होते आणि ते कष्टाचेही आहे. ते
काम जलद गतीने कसे होईल
आणि श्रमही कसे कमी पडतील यासाठी त्याचा
विचार चालू झाला.
त्यामुळे त्यावर विचार करून कपडे धुण्याचे यंत्र त्याने शोधले.
त्याने त्या यंत्राचा
कारखाना चालू केला आणि तो शेतकरी अब्जाधीश झाला.
असेच आणखी एक प्रतिकूल
परिस्थिती अनुकूल बनवण्याचे उदाहरण म्हणजे,
न्यू हॅम्पशायर इथल्या
एका माणसाने त्याची कोरडवाहू शेती कशी उपयोगात आणली
पाहा. तो एकदा हॉटेलात
गेला असता त्याला ट्राउट हा रुचकर मासा लोक आवडीने
खात असल्याचे लक्षात
आले. त्याने मत्स्य पालन विषयक एक पुस्तक विकत
घेतले, त्याचे शेत नाहीतरी नापीकच
होते. तिथे नुसतेच पाणी वाहात असे. तिथे एक
बांध घातला आणि त्याने
ट्राउट मासे पाळण्याचा व्यवसाय सुरू केला. थोड्याच
दिवसात त्याला त्या
माशांपासून चांगले उत्पन्न मिळायला लागले.
मी ही उदाहरणे दिली त्यातून तुम्ही स्फूर्ती घेऊन काहीतरी श्रेष्ठ कार्य
करावे
• यासाठी तुम्ही तरुण मुलांनी
परिश्रम तर करायला हवेतच. शिवाय समोर आलेल्या
• संधीचा पुरेपूर फायदा करून
घेतला पाहिजे. तुमच्या मनात येणारे विचार, कल्पना,
• प्रकल्प यांना मूर्त स्वरूप
देणे केवळ तुमच्याच हातात आहे. सतत आपली पंचेंद्रिये
• उघडी ठेवून, दक्ष राहून काम करत चला. उत्कर्ष तुमचाच आहे. जे लोक डोळे
उघडून जग पाहतात, विचार करतात, आपल्या कल्पना व्यवहारात उतरवतात,
त्यांच्या हातात
व्यापार, व्यवसायाच्या,
कारखानदारीच्या नाड्या असतात.
अर्थातच त्यांच्या
हातातच उत्कर्षाच्याही दोऱ्या असतात.
केवळ शालेय शिक्षण हेच
आयुष्याचे ध्येय असते असेही नाही. सचीन
तेंडुलकर हा बारावीत
नापास झाला होता. पण क्रिकेट विश्वात तो अनभिषिक्त
सम्राट झाला. पेट्रोल
पंपावर पेट्रोल भरणारा एक सामान्य माणूस धीरूभाई अंबानी,
रिलायन्स विश्व त्याने
उभे केले. सगळ्यांच्या बुद्धीची कुवत सारखीच नसते. कुणाला
शालेय शिक्षणात गोडी
असेल, तर
कुणाला कुठल्या कलेमधे रस असेल. ज्याच्या
त्याच्या आवडीप्रमाणे
त्याने क्षेत्र निवडावे आणि संधी आली की ती त्याने
पकडावी. प्रत्येकाचे
कौशल्य वेगळे. ते फक्त ज्याने त्याने ओळखले पाहिजे.
एका कायद्याच्या
विद्यार्थ्याने एकदा डॅनियल वेबस्टरकडे तक्रार केली,
“अलीकडच्या काळात तरुणांना फारशी
संधीच राहिलेली नाही." त्यावर
वेबस्टरने उत्तर दिले, “शिखरावर नेहमीच खूप जागा
रिकामी असते. तिथवर
पोचले मात्र पाहिजे.
या जगात सुसंधी गाठणाऱ्या माणसाला सर्व दरवाजे उघडे असतात.
बाल्टिमोर येथील एका
स्त्रीचा हिरे बसवलेला एक मौल्यवान दागिना एका नृत्याच्या
कार्यक्रमात हरवला.
तिला वाटले तो आपल्या खिशातून कोणीतरी चोरला. अनेक
वर्षे गेली. तिची
आर्थिक परिस्थिती बिघडली. तिची अन्नान्न दशा झाली. एकदा
तिने आपला जुना ड्रेस
पडदा शिवण्यासाठी म्हणून कापला. त्या वेळी त्या ड्रेसच्या
अस्तरात अडकलेला तो
हिऱ्याचा दागिना सापडला. तिने तो दागिना बऱ्याच
किमतीला विकला. हजारो
डॉलर्स त्या ड्रेसच्या अस्तरात पडून होते आणि ती
गरिबीत राहत होती. कारण
आपल्याजवळ संपत्ती आहे, हे
तिला माहीतच नव्हते.
आपल्यापैकी अनेकजण
स्वत:ला गरीब समजतात, पण
त्यांच्याकडे अस्तरात
लपलेल्या अशा कित्येक
संधी त्यांना वेळेवर सापडतच नाहीत. त्या संधी आपली
वाट पहात असतात, पण त्या आपल्याला दिसत नाहीत,
ही शोकांतिका आहे.
एका तरुणाला असे लक्षात
आले की छोट्या प्रमाणात समारंभ आणि
मेजवानी देण्यामध्ये
लोकांना अडचणी येतात. त्याने नोकरी मिळवायचा नाद
सोडला. आणि केटरिंगचा
व्यवसाय सुरू केला. हे केटरिंग तो राहत असलेल्या
वसाहतीतच करायला लागला.
काही वर्षातच त्याने बंगला बांधला.
पण काही तरुणांना असे
वाटते की आपण आपले राहण्याचे क्षेत्र सोडून
दुसरीकडे गेलो की आपले
भाग्य उजळेल. ब्राझिलमधल्या काही तरुण धनगरांनी
नशीब काढण्यासाठी
कॅलिफोर्नियाला जायचे ठरवले. तेथे त्यांना सोने खणून
काढायचे होते. प्रवासात
खेळण्यासाठी त्यांनी आपल्याबरोबर काचेच्या पारदर्शक
गोट्या घेतल्या.
त्यांनी खेळता खेळता बऱ्याचशा गोट्या समुद्रात फेकून दिल्या.
ते सर्व अडाणी आणि
निरक्षर धनगर होते. सॅनफ्रान्सिस्को इथे उतरल्यावर त्यांच्या
लक्षात आले की ज्यांना
ते गोट्या समजत होते, वास्तवात
ते हिरे होते. ते पुन्हा
ब्राझीलकडे परतले. तिथे
पोचल्यावर त्यांना समजले की ज्या रानात त्यांना
गोट्या सापडल्या आहेत, ती सर्व जमीन एका खाण मालकाने
सरकारकडून
विकत घेतली आहे. तिथे
हिऱ्याची खाण सुरू झाली आहे. ती जमीन मेंढ्या
चारण्याची होती. थोडी
खटपट केली असती तर सरकारने ती जमीन त्यांना
अल्प किमतीत दिली असती.
प्रत्येकाला
परमेश्वराने एक काम दिलेले आहे. ती आपली जबाबदारी आहे;
पण ते काम कोणते हे
मात्र आपल्यालाच शोधायचे असते. कित्येकांनी ही
जबाबदारी, हे काम कोणते हे ओळखले आणि ते
पूर्णत्वाला नेले. संधी समोर
आल्यावर त्यांनी ती
पकडली. परंतु चार गोष्टी अशा आहेत की त्या पुन्हा परतून
येत नाहीत. बोललेला
शब्द, सोडलेला
बाण, गत आयुष्य आणि सोडून दिलेली
सुसंधी. तुम्ही जितक्या
जास्त संधी वापराल तितक्या संधी तुम्हाला मिळत जातात
तितक्या संधी
पुनःपुन्हा तुमच्यासाठी निर्माण होतात. जो आपली कामगिरी चोख
पार पाडतो, त्याला नवीन नवीन दरवाजे खुले
होतात.
परिस्थितीच्या
तापलेल्या लोखंडावर घण मारूनच तुम्हाला नवे कार्य घडवावे
लागते. तुमच्या आसपास
चहुबाजूला खूप संधी आहेत. हजारो वर्षे माणूस
